शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी : बाळा नांदगावकर

'शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहेत,' अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पवारांबद्दल हे कौतुकोद्गार काढले.

शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी : बाळा नांदगावकर

पुणे : 'शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहेत,' अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पवारांबद्दल हे कौतुकोद्गार काढले. पुण्यातल्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधे खासदार अशोक मोहोळ यांचा अमृतमहोत्सव पार पडला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला शरद पवारांसह विविध पक्षातले मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसेतून बाहेर पडलेले नगरसेवक, फेरीवाल्यांचा मुद्द्यावरुन राजकीय फटकेबाजीही केली.

बाळा नांदगावकर म्हणाले की, “पवार साहेबांना आम्ही बाळासाहेबांच्या जागी मानतो. त्यामुळे त्यांच्याविषयी एक वेगळा आदर आमच्या मनात आहे.”

पंतप्रधान मोदींच्या शरद पवारांवरील वक्तव्यावरुन बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, “मध्यंतरी आम्ही ऐकलं होतं की, पवार साहेबांचं बोट धरुन अनेक माणसं मोठी झाली. कुठे कुठे पोहोचली. पण पवार साहेब मराठी माणसाच्या मनात एक मोठी खंत आहे. तुम्हाला पद्मभूषण मिळालं, याचा निश्चित आनंद आहे. एक ‘पी’ तर मिळाला, पण दुसरा ‘पी’ कधी मिळणार.”

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MNS Leader Bala Nandgavkar on sharad pawar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV