पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे मुंढेंना ही धमकी देण्यात आली आहे. मुंढेंनी आज संध्याकाळी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी

पुणे : पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे मुंढेंना ही धमकी देण्यात आली आहे. मुंढेंनी आज संध्याकाळी स्वारगेट पोलिस स्टेशन गाठत यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

पीएमपीमध्ये तुम्ही केलेली भाडेवाढ समर्थनीय नाही, तुम्ही केलेल्या भाडेवाडीमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे लवकरात लवकर भाडेवाढ मागे घ्या, अन्यथा तुमचं आयुष्य उद्धस्त करु, तसंच तुमच्या कुटुंबाचंही बरं-वाईट करु असं पत्रात सांगण्यात आलं.

तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही लाच घेतल्याचे पुरावे आमच्याकडे असून ते मुख्यमंत्र्यांना आणि न्यायालयाला सादर करु, त्यामुळे भाडेवाढ तातडीनं मागे घ्या, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जा, असा धमकीवजा इशाराच पत्रातून देण्यात आला आहे.

भुजंगराव मोहिते असं पत्र लिहिणाऱ्याचं नाव पत्रात नमूद करण्यात आलं असून सुखसागर नगर पुणे असा पत्ताही पत्रात लिहिण्यात आला आहे. आम्ही ग़डचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या संपर्कात असून वेळ आल्यास तुमचा खूनही करु अशी या पत्रात धमकी देण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंना पाठवण्यात आलेलं धमकीचं पत्र

tukaram mundhe threat letter-compressed

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV