पुण्यात इन्क्युबेटर तापल्याने भाजलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू

स्वाती यांचं सिझर झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं.

पुण्यात इन्क्युबेटर तापल्याने भाजलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू

पुणे : इन्क्युबेटरचं तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात बुधवार पेठेतील वात्सल्य मॅटर्निटी होममध्ये ही घटना घडली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळाचे वडील विजयेंद्र कदम हे रिक्षाचालक आहेत. विजयेंद्र आणि स्वाती कदम या दाम्पत्याला मुलगी झाली. स्वाती यांचं सिझर झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं.

मंगळवारी सकाळी इन्क्युबेटरमधील तापमान वाढल्यामुळे बाळ 80 टक्के भाजलं होतं. त्यानंतर बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र बुधवारी त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मंगळवारी स्फोटासारखा आवाज येऊन मशिनमधून धूर आल्याचा दावा कदम कुटुंबीयांनी केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे इन्क्युबेटर ओव्हरहिट झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

वात्सल्य हॉस्पिटलचे गायनॅकॉलिजस्ट गौरव चोपडे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कलम 287 (मशिनरीबाबत हलगर्जी) आणि 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहचवणारं विघातक कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे वॉर्मर तापलं, मात्र हॉस्पिटलकडून कोणतीही हलगर्जी नव्हती, असा दावा डॉ. गौरव चोपडेंनी केला.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV