पिंपरीत तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयसह 10 जणांवर गुन्हा

पिंपरीतील सुरज काटे या तरुणाने 24 फेब्रुवारीला वाढदिवसाला तलवारीने केक कापला.

पिंपरीत तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयसह 10 जणांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड : वाढदिवसाला तलवारीने केक कापणं बर्थडे बॉयसह त्याच्या मित्रांना चांगलंच महागात पडलं. पिंपरीत बर्थडे बॉय सुरज काटेसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू पिंपळे सौदागर भागात ही घटना उघडकीस आली आहे.

सुरज काटे या तरुणाचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता. बर्थडे साजरा करताना सुरजने तलवारीने केक कापला. विशेष म्हणजे या वाढदिवसाला भाजपचे आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे ही उपस्थित लावली होती.वाढदिवसाचे फोटोही सुरजने फेसबुकवर टाकले. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अटकेतील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pimpari : Birthday boy Surat Kate arrested for cutting cake by sword latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV