चिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेला अटक

लाकडी पट्टीने या मुलाच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारण्यात आलं. हा मार इतका जोरात होता, ज्यामुळे मुलाचे डोळेही सुजले आहेत.

चिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेला अटक

पिंपरी चिंचवड : तीन वर्षांच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या कोचिंग क्लासच्या निर्दयी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. भाग्यश्री पिल्ले असं शिकवणी शिक्षिकेचं नाव आहे. सांगवी पोलिसांनी आज ही कारवाई केली.

पिंपळे गुरवमध्ये चार दिवसांपूर्वी देव कश्यप या मुलाला शिक्षिकेने अमानुष मारहाण केली होती. लाकडी पट्टीने या मुलाच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारण्यात आलं. हा मार इतका जोरात होता, ज्यामुळे मुलाचे डोळेही सुजले आहेत.

पिंपरीत तीन वर्षीय चिमुकल्याला कोचिंग क्लासच्या शिक्षिकेची अमानुष मारहाण

शिक्षिकेकडून मारहाण केल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठलं. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप देवच्या नातेवाईकांनी केला आहे. देवचे सुजलेले डोळे पाहूनच शिक्षिकेने केलेली मारहाण किती अमानुष होती, याची कल्पना येते.

तर मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र कुटुंबीय तिथून निघून गेले, असा दावा पोलिसांनी केला आहे.

अखेर काल रात्री पोलिसांनी शिक्षिकेविरोधात बाल संरक्षक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आज तिला अटक केली.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV