शिवनेरीहून शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवप्रेमीचा अपघाती मृत्यू

शिवनेरी इथून वाई इथल्या पाचपुतेवाडी येथे शिवजयंती उत्सवासाठी ही शिवज्योत घेऊन हे शिवप्रेमी निघाले होते

शिवनेरीहून शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवप्रेमीचा अपघाती मृत्यू

पिंपरी चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीहून शिवज्योत घेऊन निघालेल्या एका शिवप्रेमीचा अपघातात मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्वप्निल चव्हाण असं मृताचं नाव आहे. तर अमर पाचपुते आणि विनायक चव्हाण हे दोघे जखमी झाले आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण इथे सोमवारी रात्री हा अपघात झाला. शिवनेरी इथून वाई इथल्या पाचपुतेवाडी येथे शिवजयंती उत्सवासाठी ही शिवज्योत घेऊन हे शिवप्रेमी निघाले होते. तेव्हा चाकण इथे शिवज्योतीत तेल घालण्यासाठी एक दुचाकी घेऊन स्वप्निल, अमर आणि विनायक थांबले.

तिथेच काळाने घाला घातला. मागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला तर अमर आणि विनायक गंभीर जखमी झाले. या प्रकरणी चाकण पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pimpari Chichwad : Shivpremi carrying shivjyot from Shivneri died in an accident
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV