पिंपरीत तोडफोडीचं सत्र सुरुच, गाड्या आणि घराच्या काचाही फोडल्या

दहशत पसरवण्यासाठी टोळक्याने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास वाहनांना लक्ष्य करुन तोडफोड केली

पिंपरीत तोडफोडीचं सत्र सुरुच, गाड्या आणि घराच्या काचाही फोडल्या

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या वर्षी सुरु असलेलं तोडफोडीचे सत्र यंदाही कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी याची प्रचिती शहरवासियांना आली. पिंपरीच्या रामनगर येथील दहा ते बारा वाहनांसह अनेक घरांना ही समाजकंटकांनी लक्ष्य केलं.

दहशत पसरवण्यासाठी टोळक्याने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास वाहनांना लक्ष्य करुन तोडफोड केली. तलवार, कोयते आणि हातात लाट्या-काठ्या घेऊन पंधरा ते वीस टवाळखोरांनी हैदोस घातला.

पिंपरीच्याच संत तुकारामनगर आणि वाकडच्या थेरगावमध्ये दोन दिवसांपूर्वी 17 वाहनांची तोडफोड झाली होती. या घटनांमुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे नागरिकांना तोडफोड कोणी केली हे माहित असूनही, कॅमेऱ्यासमोर कोणीच बोलायला तयार नाही.

पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून नऊ जण अद्याप पसार आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pimpari Chinchwad : Gang of 15 to 20 youth ransacked vehicles
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV