पिंपरीत लिफ्टमुळे महिलेने जीव गमावला

निलिमा चौधरी यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

पिंपरीत लिफ्टमुळे महिलेने जीव गमावला

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका ज्येष्ठ महिलेला बिल्डिंगमधील लिफ्टमुळे जीव गमवावा लागला. निलिमा चौधरी असं या महिलेचं नाव आहे. पिंपळे सौदागर इथल्या साई श्री सोसायटीत दिवाळीत ही घटना आहे.

निलिमा दिवाळीच्या सुट्टीसाठी चौधरी झारखंडहून पिंपळे सौदागर इथे मुलाकडे आल्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या निलिमा यांचा नातू 23 ऑक्टोबर रोजी आजारी पडला होता. त्याला डॉक्टरकडे नेण्याची घाई सुरु होती. मात्र तळमजल्यावर येताच मोबाईल आणि पर्स घरात राहिल्याचं निलिमा यांच्या लक्षात आलं. म्हणून त्या परत सातव्या मजल्यावरील घरी गेल्या.

मोबाईल घेऊन त्यांनी लिफ्ट पुन्हा बोलावली. लिफ्टचा दरवाजा उघडला, पण लिफ्ट वर आलीच नाही. पाऊल टाकताच निलिमा त्या लिफ्टच्या खाईत सातव्या मजल्यावरुन थेट पहिल्या मजल्यावर कोसळल्या.

प्रातिनिधिक फोटो प्रातिनिधिक फोटो

लिफ्ट पडली तेव्हा जोरात आवाज आला, वॉचमन धावत वर गेला, लिफ्टमधून रक्त वाहताना दिसले आणि त्याने दरवाजा उघडला तेव्हा कळलं काय झालं?, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. निलिमा चौधरी यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अहवाल मागितला आहे. पण घटनेला महिना उलटून गेला, पण अजून काहीच झालेलं नाही.

निलिमा यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या यंत्रणेला, लोकांना धडा मिळायला हवा. पण या घटनेतून प्रत्येकाने धडा घेण्याची गरज आहे. त्यामुळे लिफ्टमधून प्रवास करताना जरा जास्त सतर्क राहा

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pimpari Chinchwad : Woman died after lift slab collapse on her head
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV