एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थ्याला भोसकलं

दहावीत शिकणारा वेदांत आणि त्याची मैत्रीण वेदांतच्या घरी परीक्षेचा अभ्यास करत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास अभ्यास करुन झाल्यावर वेदांत मैत्रिणीला घरी सोडायला गेला.

एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थ्याला भोसकलं

पिंपरी चिंचवड : पिंपरीमधील दहावीच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून वेदांत भोसलेची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

दहावीत शिकणारा वेदांत आणि त्याची मैत्रीण वेदांतच्या घरी परीक्षेचा अभ्यास करत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास अभ्यास करुन झाल्यावर वेदांत मैत्रिणीला घरी सोडायला गेला. तिला सोडून परत येताना पूर्णानगर भागात वेदांतवर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला.

काही नागरिकांनी वेदांतला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पिंपरीत दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

परंतु वेदांत सोडायला गेलेल्या मुलीवर आरोपीचं एकतर्फी प्रेम होतं. त्यातूनच वेदांतची चाकूने भोसकून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान,  अल्पवयीन मुलावर हल्ला होण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. सोमवारी सकाळी अकरावीतील रुपेश गायकवाडवर हल्ला झाला. रुपेशवर चक्क जैन महाविद्यालयातच हल्ला झाला होता.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pimpari : One-sided love affair takes life of boy
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV