पिंपरीतील 'त्या' खड्ड्यात काल उकळतं, आज थंडगार पाणी

महापालिकेचे उद्यान अधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. खड्ड्याखालून गेलेली थ्री फेज वायर बाहेर काढण्यात आली.

पिंपरीतील 'त्या' खड्ड्यात काल उकळतं, आज थंडगार पाणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील 'त्या' खड्ड्यातून आज चक्क थंड पाणी बाहेर आलं. काल याच खड्ड्यातील उकळत्या पाण्यामुळे दहा सेकंदात प्लास्टिकची बाटलीही वितळली होती. थ्री फेज वायरच्या करंटमुळे उकळतं पाणी आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलं होतं. आश्चर्य आणि काही काळ भीती निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे शहरातच नव्हे, तर राज्यात खळबळ उडाली होती.

पिंपरीत खड्ड्यात अचानक उकळतं पाणी, बाटलीही वितळते


महापालिकेचे उद्यान अधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. त्यावेळी खड्ड्याखालून गेलेली थ्री फेज वायर बाहेर काढण्यात आली.

थ्री फेज वायरच्या करंटमुळे उकळतं पाणी बाहेर पडत होतं, असा निष्कर्ष काढण्यात येत असला, तरी खबरदारी म्हणून भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pimpari : The Pothole which has boiling water yesterday, gives cold water today latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV