व्हायरल व्हॉट्सअॅप पोस्टमुळे पिंपरीत अंध दाम्पत्याची ससेहोलपट

Pimpri : Blind Couple facing problem due to fake Whatsapp Viral latest update

पिंपरी चिंचवड : व्हॉट्सअॅपवरील एका व्हायरल पोस्टमुळे पिंपरी चिंचवडमधल्या एका अंध दाम्पत्याचं जगणं मुश्कील झालं आहे.

‘फोटोमधील लहान मुलगी ही पिंपरीतल्या अजमेरा, मासुळकर कॉलनी येथे दिसली आहे. भिकारी म्हणतात, की ती मुलगी आमची आहे. पण हे पटण्यासारखं नाही. हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा… काय माहिती, कोणाची चिमुरडी पुन्हा त्यांना भेटेल.’

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या या चार ओळींच्या मेसेजमुळे या अंध दाम्पत्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.

धर्मेंद्र लोखंडे आणि शीतल लोखंडे, जन्माने 100 टक्के अंध. 2012 मध्ये दोघांचं लग्न झालं. दुसऱ्या वर्षी एक गोंडस मुलगी झाली. पण तीच मुलगी त्यांची नसल्याचा दावा करणारी पोस्ट कुणीतरी त्यांच्या फोटोसकट व्हायरल केली आणि त्यांच्यामागे लोकांचा ससेमिरा सुरु झाला.

भेदरलेल्या दाम्पत्याला काहीही कळेना. दोघांवर त्यांच्याच मुलीच्या अपहरणाचा आरोप लागला होता. या दाम्पत्याची कौटुंबिक माहिती घेण्यासाठी ‘एबीपी माझा’ची टीम त्यांच्या घरीही गेली, तेव्हा या दोघांचा सच्चेपणा आणखी गडद झाला.

सिंधुबाई निकम या अंध दाम्पत्याच्या शेजारी राहतात. माझ्या डोळ्यासमोर दोघांचं लग्न झालं. माझ्यासमोर मूल झालं. लोकांनी असं करायला नको, असं त्या पोटतिडकीने सांगतात.

ज्यांनी आयुष्यात कधीच उजेड पाहिला नाही, ते दाम्पत्य सध्या डोळस माणसांच्या अंधविश्वासामुळे संशयाच्या अंधारात चाचपडत आहे.

व्हॉट्सअॅपर येतं, ते सगळंच खरं असं मानून, आला मेसेज की कर फॉरवर्ड या संस्कृतीमुळे धोका वाढला आहे. तंत्रज्ञानावर ताबा कसा मिळवलता येईल हे माहित नाही. आपण आपल्यावर मात्र ताबा ठेवण्याची गरज आहे.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pimpri : Blind Couple facing problem due to fake Whatsapp Viral latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या
गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक

उद्योजक अविनाश भोसले आणि विश्वजीत कदमांवर आयकर छापे
उद्योजक अविनाश भोसले आणि विश्वजीत कदमांवर आयकर छापे

पुणे: पुण्यातील नामांकित उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर

हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू
हिट अॅण्ड रन: पुण्यात तरुण इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

पुणे: पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना काल (गुरुवार) घडली.

पुण्यात नागानेच नागाला गिळलं!
पुण्यात नागानेच नागाला गिळलं!

पुणे: पुण्याच्या मंचरमध्ये नागानेच नाग गिळल्याचा प्रकार समोर आला

उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश
उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश

पुणे: शहरालगतच्या  34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे

पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बिश्रामबाग

शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!
शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!

पुणे : चाकणमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी ढासळली आहे.

लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू
लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू

पिंपरी : लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्यानं एका

लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी
लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी

पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास

तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?
तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?

पुणे : तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना थोडं सजग राहणं गरजेचं