दुचाकीवरुन जाताना मांजा कापला, चिमुकल्याला 32 टाके

हा चिमुरडा आपल्या काकांसोबत दुचाकीवरुन फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता.

दुचाकीवरुन जाताना मांजा कापला, चिमुकल्याला 32 टाके

पुणे: मांजा किती धोकादायक ठरु शकतो याचं उदाहरण पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीत घडलं आहे. दुचाकीवरून जाताना लहान मुलाच्या डोळ्याला रस्त्यावर लटकत असणारा मांजा कापल्यानं डोळ्याला गंभीर इजा झाली. हमजा खान असं या तीन वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे.

हा चिमुरडा आपल्या काकांसोबत  दुचाकीवरुन फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. दुचाकीवर हा चिमुरडा पुढे बसला होता. काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर इथे आल्यावर रस्त्यावर लटकत असणारा मांजा त्याच्या डोळ्यावर कापल्याने ही गंभीर इजा झाली.

हमजाला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करून, त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

पतंग उडवणाऱ्यांमध्ये पतंग गुल करण्याची स्पर्धा लागते. अशातच ज्याची पतंग गुल होते, तो त्याचा मांजा तसाच सोडून जातो. त्यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pimpri Chinchwad : Child seriously injured because oh kite thread Manja update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV