मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक शरण

बनावट कागदपत्र सादर करण्याचा ठपका असणारा पिंपरी चिंचवडचा भाजप नगरसेवक अखेर पोलिसांना शरण आला आहे. तुषार कामठे असं या नगरसेवकाचं नाव आहे.

मनपा निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक शरण

पिंपरी-चिंचवड : बनावट कागदपत्र सादर करण्याचा ठपका असणारा पिंपरी चिंचवडचा भाजप नगरसेवक अखेर पोलिसांना शरण आला आहे. तुषार कामठे असं या नगरसेवकाचं नाव आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठेंनी 27 ऑक्टोबरला सांगवी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासूनच कामठेचा मोबाईल नॉट रिचेबल होता. अखेर पोलिसांच्या अटकेच्या भितीने कामठेने पोलिसांना शरण येणं पसंत केलं.

2017 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामठेने 12 वी उत्तीर्ण असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं होतं. तसे पुरावे सचिन साठेंनी पोलिसांना सादर केले.

त्यानंतर तपासाअंती ते बनावट असल्याचे सिद्ध झालं. अखेर 20 दिवसांनी कामठे पोलिसठाण्यात हजर झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 (ब) पिंपळे निलखमधून तुषार कामठे हे निवडणुकीला उभे होते. महापालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या सचिन साठे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pimpri chinchwad mnc bjp corporator tushar kamthe surrender latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV