पीएमपीएमएलच्या बसचालक आणि वाहकाकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

पीएमपीएमएलच्या बसचालक आणि वाहकानं ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

पीएमपीएमएलच्या बसचालक आणि वाहकाकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

पुणे : पीएमपीएमएलच्या बसचालक आणि वाहकानं ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

अपेक्षित बसस्टॉपवर बस थांबवली नाही. म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि बसचालकात वाद झाला. त्यानंतर चालकानं ज्येष्ठ नागरिकाला थेट बसमधून उतरवत शिवीगाळ केली, आणि त्या ज्येष्ठ नागरिकास मारहाण करण्यास सुरुवात केली. पुण्याच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नागरिकांशी अरेरावीने बोलणे, उधट वर्तन, प्रवाशांना बसमधून उतरण्यापूर्वीच बस पुढे नेणे. अशिक्षित नागरिकांना अपमानित करणे, यासारखे प्रकार नेहमीच घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

त्यामुळे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे अशा गुंड प्रवृत्तीच्या बसचालक आणि वाहकांवर कारवाई करणार का? असा सवाल पुणेकरांमधून उपस्थित केला जात आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV