मुंढेंनी PMPML मध्ये घेतलेले निर्णय संचालक मंडळाकडून रद्द

बडतर्फ आणि निलंबित करण्यात आलेल्या 158 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येणार आहे.

मुंढेंनी PMPML मध्ये घेतलेले निर्णय संचालक मंडळाकडून रद्द

पुणे : पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरुन तुकाराम मुंढे पायउतार होताच संचालक मंडळाने त्यांनी घेतलेले सर्व निर्णय बदलले आहेत. मुंढेंनी कामावरुन काढून टाकलेल्या 158 कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करुन घेण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढेंनी नाशिक पालिकेची साफसफाई हाती घेतली आहे. मात्र पीएमपीएमएलमध्ये पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंढेंनी अध्यक्षपदी असताना घेतलेले निर्णय पीएपीएमएलच्या संचालक मंडळाने रद्द केले आहेत.

बडतर्फ आणि निलंबित करण्यात आलेल्या 158 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येणार आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पासमधे करण्यात आलेली वाढही मागे घेतली जाणार. मुंढेंच्या काळात मंजूर झालेला आस्थापना आराखडाही नामंजूर करण्यात येणार आहे.

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर महापौर, सरंजामी समिती अध्यक्ष, उपमहापौर, नगरसेवक अशा राजकीय व्यक्ती आहेत. संचालक मंडळाने घेतलेले हे निर्णय तुकाराम मुंढेंच्या जागी आलेल्या नयना गुंठे मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

संबंधित बातम्या :


नाशिक महापालिकेतून देवांचे फोटो हटवा, तुकाराम मुंढेंचे आदेश


कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी


तुकाराम मुंढेंचा पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्याला दणका


मुंढे नाशिक पालिका आयुक्तपदी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PMPML cancels decision taken by Tukaram Mundhe latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV