सिगरेटच्या पाकिटानं भरलेला टेम्पो पळवणारी टोळी गजाआड

मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ 8 ते 10 जणांनी सिगरेटच्या पाकिटांनी भरलेला टेम्पो अडवून चालकाला मारहाण करत टेम्पो पळवला होता. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच जणांना अटक केली.

सिगरेटच्या पाकिटानं भरलेला टेम्पो पळवणारी टोळी गजाआड

लोणावळा : सिगरेटनं भरलेला टॅम्पो पळवणाऱ्या एका चोरांच्या टोळीला लोणावळा पोलिसांनी गजाआड केलं आहे.

रांजणगाव एमआयडीसीतल्या टोबॅको कंपनीतून हा टेम्पो वेगवेगळ्या सिगरेटचे 865 कार्टन घेऊन अंबरनाथकडे निघाला होता. मात्र, मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ 8 ते 10 जणांनी हा टेम्पो अडवला आणि चालकाला मारहाण करुन टेम्पो पळवला. यानंतर चालकाच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

tempo 1

पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टेम्पो चोरणारी ही टोळी कैद झाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना गजाआड केलं तर 3 आरोपी अजूनही फरार आहेत. या संपूर्ण सिगरेट पाकिटांची बाजारातली किंमत तब्बल 1 कोटी 87 लाख रुपये आहे. पोलिसांनी सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV