डीएसके आणि त्यांच्या पत्नीला १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डीएसके आणि त्यांच्या पत्नीला १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर कोर्टाने आज (शुक्रवार) हा निर्णय दिला

गेले काही दिवस डीएसकेंवर सुरुवातीला ससून आणि नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.

दरम्यान, आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा डीएसके आणि त्यांच्या पत्नीच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी मागणी कोर्टापुढे केली. कोर्टानेही त्यांची ही मागणी मान्य करत दोघांनाही 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस पुन्हा एकदा डीएसकेंची चौकशी करुन त्यांच्यी रवानगी कोठडीत करतील.

दुसरीकडे डीएसकेंना येरवडा कारागृहात पाठवण्यास त्यांच्या  वकीलांनी विरोध केला आहे. 'येरवडा जेलमध्ये अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार आहेत. तसेच वैद्यकीय सुविधा देखील नाहीत. त्यामुळे त्यांना येरवडामध्ये पाठवू नये.' अशी मागणी त्यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान केली.

डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं होतं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं होतं. त्यानंतर डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक करण्यात आली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणूकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले.

मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे.

2014 पासून अनेकांनी घर बूक केलं. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.

स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.

सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.

इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे.

अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले.

सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं.

मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी कोर्टाने आता डीएसकेंना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.

संबंधित बातम्या

बँकेकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव

डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल

डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार

डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर

डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक

डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट

डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी

डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!

डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Police custody of DSK and wife Hemanti till March 1 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV