पोलिसांच्या गाडीत वऱ्हाड, मद्यधुंद चालकाची रस्त्यावरील वाहनांना धडक

मद्यधुंद पोलीस व्हॅन चालकाने सात ते आठ गाड्यांना धडक दिल्याची घटना काल रात्री पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पोलीस व्हॅनमधून गुन्हेगार नाही, तर चक्क लग्नाचं वऱ्हाड नेलं जात होतं.

पोलिसांच्या गाडीत वऱ्हाड, मद्यधुंद चालकाची रस्त्यावरील वाहनांना धडक

पुणे : मद्यधुंद पोलीस व्हॅन चालकाने सात ते आठ गाड्यांना धडक दिल्याची घटना काल रात्री पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पोलीस व्हॅनमधून गुन्हेगार नाही, तर चक्क लग्नाचं वऱ्हाड नेलं जात होतं.

काल शुक्रवारी रात्री कोंढवा परिसरात एका पोलीस व्हॅनने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या व्हॅनचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. चालक मद्यपान करुन व्हॅन चालवत असल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या व्हॅनमधून लग्नाचं वऱ्हाड नेलं जात होतं. ही गाडी पोलिसांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी वापरण्यात आल्याची शक्यता आहे.

सध्या या चालकासंदर्भात भारती विद्यापीठ पोलिसांकडे 2 ते 3 तक्रारी आल्या आहेत. मात्र पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यानं गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: police van hits 7 to 8 vehicles on road in pune latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV