पिंपरी चिंचवडमध्ये 'पोर्टेबल टॉयलेट'

लोटा गँगच्या सदस्य राहिलेल्या महिलांना दिवस उजाडण्यापूर्वीच शौचास जावं लागतं. तर दिवसभर शर्मेपोटी मात्र या नैसर्गिक विधी रोखून धराव्या लागतात. यातून महिलांना अनेक आजार झाल्याचंही दिसून आलं आहे. आता मात्र त्यांची यातून सुटका होणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये 'पोर्टेबल टॉयलेट'

पिंपरी चिंचवड : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आजही महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. मात्र अक्षय कुमारच्या टॉयलेट 'एक प्रेम कथा' या चित्रपटानंतर शहरातील चित्र बदलू लागलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने पोर्टेबल टॉयलेटची उभारणी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 52 झोपडपट्ट्यांच्या परिसरात शौचालयांची समस्या भेडसावत आहे. येथील स्थानिकांकडून शौचलयाच्या होणाऱ्या मागणीची प्रशासन दखलच घेत नव्हतं. मात्र आता जर प्रत्येक महिलेला स्वच्छताग्रहाचा अधिकार मिळाला नाही, तर 'टॉयलेट एक प्रेम कथा'मधील प्रसंग इथेही उद्भवू शकतो. पिंपरी चिंचवड महापालिकेला ही समस्या लक्षात आली.

त्यानंतर महापालिका 52 ठिकाणी टप्प्या-टप्प्याने 244 पोर्टेबल टॉयलेट उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. लोक पोर्टेबल टॉयलेटचा वापर करु लागले की  तिथं कायमस्वरुपी शौचालये बांधले जाणार आहेत.

'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटानंतर महापालिका प्रशासनाची मानसिकता बदलली आहे. अशीच मानसिकता राज्यातील प्रशासनाने बदलली तर हगणदारी मुक्त महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. मात्र प्रश्न असा आहे की, समस्या सोडवण्यासाठी किंवा समस्या लक्षात येण्यासाठी आपल्या प्रशासनाला चित्रपटांची गरज भासणार आहे का? आणि तसं असेल, तर ती आपली शोकांतिकाच म्हणायला हवी.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Portable Toiltes by Pimpri Chunchwad latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV