ज्योतीकुमारी बलात्कार-हत्या प्रकरण, दोषींची दया याचिका फेटाळली

By: | Last Updated: > Sunday, 18 June 2017 8:33 PM
ज्योतीकुमारी बलात्कार-हत्या प्रकरण, दोषींची दया याचिका फेटाळली

नवी दिल्ली : पुण्यात 2007 साली घडलेल्या ज्योतीकुमारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी फेटाळली आहे. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

22 वर्षीय ज्योती कुमारी चौधरी विप्रो कंपनीच्या बीपीओची कर्मचारी होती. 1 नोव्हेंबर 2007 रोजी ज्योतीकुमारीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिच्या कंपनीचा कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

शिक्षा सुनावल्यानंतर दोघांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथंही शिक्षा कायम राहिल्यानंतर गेल्या मे महिन्यात त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. मात्र, राष्ट्रपतींनीही त्यांचा दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे.

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 2 महिन्यात संपणार आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी एकूण 30 दयेच्या याचिका फेटाळल्या. याआधी राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभा पाटील यांनी दयेच्या 34 अर्जांना मान्यता देऊन 3 अर्ज फेटाळले होते. तर ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी केवळ 1 दयेचा अर्ज फेटाळत एका अर्जासाठी क्षमादान दिले होते.

First Published:

Related Stories

देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी
देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी...

मुंबई : आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात

निवृत्त सैनिकासह कुटुंबाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
निवृत्त सैनिकासह कुटुंबाच्या...

अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगावमध्ये निवृत्त सैनिक आणि त्यांच्या

रक्ताचं नातं असून आम्हाला अश्रू ढाळायला बंदी होती : धनंजय मुंडे
रक्ताचं नातं असून आम्हाला अश्रू...

सोलापूर : नातं रक्ताचं असलं तरी अश्रू ढाळायला बंदी होती. 22

खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!
खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून...

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे

संपूर्ण कर्जमाफी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन : सुकाणू समिती
संपूर्ण कर्जमाफी न केल्यास...

मुंबई : सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीवर आक्षेप घेत सुकाणू समितीने

विठूमाऊलीचं आता 24 तास दर्शन घेता येणार
विठूमाऊलीचं आता 24 तास दर्शन घेता...

पंढरपूर : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या दर्शनाची आस ठेवून

माझा इफेक्ट : चंद्रभागेच्या पात्रातील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझा इफेक्ट : चंद्रभागेच्या...

पंढरपूर : चंद्रभागेच्या पात्रातील जीवघेणे खड्डे एबीपी माझाने

पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था
पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच...

पुणे : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली

ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा लिंब इथं पहिलं रिंगण
ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा...

सातारा : संत ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून मार्गस्थ होऊन रात्री

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं...

मुंबई : रविवारी वरुणराजा मुंबईकरांवर मेहेरबान झाला असून, मोठ्या