येरवडा जेलमध्ये एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याची दगडाने ठेचून हत्या

येरवडा जेलमध्ये एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याची दगडाने ठेचून हत्या

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. आज सकाळी दहा-साडेदहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही कैदी स्वयंपाक घरात काम करत होते. त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन वादावादी झाली होती.

आरोपी कैद्याने दुसऱ्या कैद्याचं लक्ष नसताना पाठीमागून दगडाने हल्ला केला. यात कैद्याचा मृत्यू झाला.

कारागृह प्रशासनाने पोलिसांना माहिती काळविल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सुखदेव मेघराज महापूर असे मृत कैद्याचे नाव आहे. सुखदेव अपहरणाच्या गुन्ह्यात 4 वर्षाची शिक्षा भोगत होता. तर आरोपी कैदी हा येरवडा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV