पुण्यात 39 मांजरी ताब्यात, 2 महिलांवर निगा न राखल्याचा गुन्हा

कोंढाव्यात मांजराची निगा न राखल्याने चक्क महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. दीपिका कपूर आणि संगिता कपूर असं गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावं आहेत.

पुण्यात 39 मांजरी ताब्यात, 2 महिलांवर निगा न राखल्याचा गुन्हा

पुणे: पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी भररस्त्यात जाहिरात फलकावर पॉर्न फिल्म सुरु होते, तर कधी कोणी मांजरच्या वादावरुन एकमेकाला कोर्टात खेचल्याचे प्रकार पुण्यात घडले आहेत.

आताही तसाच काहीसा प्रकार घडला आहे. पुणेकर आणि मांजरवाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

कोंढाव्यात मांजराची निगा न राखल्याने चक्क महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. दीपिका कपूर आणि संगिता कपूर असं गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावं आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी चक्क 39 मांजरी ताब्यात घेतल्या आहेत. घरात तब्बल 39 मांजरी आहेत. मात्र या मांजरींचे ते निगा राखत नाहीत, अत्यंक घाणेरड्या वातावरणात या मांजरींना जगावं लागतंय. शेजारच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शेजाऱ्यांच्या मांजरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर वंदना चव्हाणांनी मांजरांच्या मालकांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.

संबंधित बातम्या :

मांजराला मारहाण, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांना नोटीस

चितळे श्रीखंड, दहीभात खाणाऱ्या पुण्यातल्या मांजराला मारहाण 

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: cat pune पुणे मांजर
First Published:

Related Stories

LiveTV