पुण्यात 8 वर्षांच्या चिमुकलीवर गँगरेप, अल्पवयीन मुलं ताब्यात

चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं.

पुण्यात 8 वर्षांच्या चिमुकलीवर गँगरेप, अल्पवयीन मुलं ताब्यात

पुणे : आठ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिमुरडीच्या आजीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

ऑगस्ट 2017 पासून हा अत्याचार सुरु असून या प्रकरणात 6 ते 12 या वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर 18 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

यामध्ये 6, 10 आणि 12 वर्ष वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती अटकेत असलेल्या 18 वर्षीय आरोपीने दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेऊन निरीक्षणगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : 5-year-old gangraped by six, Including five juveniles
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV