पुण्यात एटीएम जळून खाक, ATM मध्ये नेमकी किती रोकड?

जळालेलं एटीएम आयसीआयसीआय बँकेचं होतं. मात्र एटीएममध्ये नेमकी किती रोकड होती, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

पुण्यात एटीएम जळून खाक, ATM मध्ये नेमकी किती रोकड?

पुणे: पुण्याच्या वारजे भागातील गणपती माथ्यावर मध्यरात्री एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली. त्यात असलेलं एटीएमही जळून खाक झालं. त्यामुळे लाखो रुपयांची रोकडही जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जळालेलं एटीएम आयसीआयसीआय बँकेचं होतं. मात्र एटीएममध्ये नेमकी किती रोकड होती, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

pune ATM fire

पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

15 दिवसांपूर्वीच पुण्यात जनता बँकेच्या एटीएमला आग लागून रोकड जळाली होती. त्यामुळे या घटनांकडे संशयानं पाहिलं जातंय.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune: ATM Fire overview report
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV