मिलिंद एकबोटेंना पुणे न्यायालयाबाहेर काळं फासण्याचा प्रयत्न

न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर एका व्यक्तीनं मिलिंद एकबोटे यांना काळं फासण्याचा प्रयत्न केला.

मिलिंद एकबोटेंना पुणे न्यायालयाबाहेर काळं फासण्याचा प्रयत्न

पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांना पुण्यामध्ये काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. काळं फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर एका व्यक्तीनं एकबोटेंना काळं फासण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे.

एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.

ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला होता.

हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मिलिंद एकबोटेंनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी 15 मार्चला राहत्या घरातून एकबोटेंना अटक केली होती.

संबंधित बातम्या :


मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

अखेर मिलिंद एकबोटे यांना अटक, घरी जाऊन पोलिसांची कारवाई!

एकबोटेंना अटक का केली नाही?, विश्वास नांगरे पाटलांचं उत्तर...

महाराष्ट्र सरकारच्या एकबोटे बचाव धोरणाचे सुप्रीम कोर्टात धिंडवडे

मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा

मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

मिलिंद एकबोटेंच्या शोधात पोलिसांचा हलगर्जीपणा

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : Attempt to throw ink on Milind Ekbote outside court latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV