'पेटा' संस्थेवर बंदी आणा, बैलगाडा संघटनेचं पुण्यात आंदोलन

'पेटा' या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या संघटेनवरच बंदी घालावी ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची मागणी आहे.

'पेटा' संस्थेवर बंदी आणा, बैलगाडा संघटनेचं पुण्यात आंदोलन

पुणे : बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटवावी, यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे 'पेटा' संघटनेचा निषेध करत या प्राणीप्रेमी संस्थेवर बंदीची मागणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने केली आहे.

बैलगाडी शर्यत संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यभरातले सदस्य बैलगाड्या घेऊन या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी योग्य आणि ठोस पावलं उचलावीत, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे.

'पेटा' या प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या संघटेनवरच बंदी घालावी ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची मागणी आहे. बैलगाड्या शर्यतींवर बंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या पेटाचा निषेध करण्यात येत आहे.

बैलगाडी शर्यतीवर बंदी घालत शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेत सर्व अडथळे दूर करावेत, अशी मागणीही या आंदोलनाद्वारे केली जाणार आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : Bailgada association protest to ban Peta latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV