पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू

पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू

पुणे : खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन  कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ऑर्डनन्स फॅटरीमध्ये आज सकाळी 9.30 च्या सुमारास दारुगोळ्याचा स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळत असताना वा एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर वाहून नेत असताना या दोन्ही वस्तूची टक्कर झाली आणि हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की, दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहे, त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV