सिंहगडावर युगुलाची आत्महत्या, प्रेमसंबंधातून टोकाचं पाऊल

सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाज्याजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन युगलाने आत्महत्या केली.

सिंहगडावर युगुलाची आत्महत्या, प्रेमसंबंधातून टोकाचं पाऊल

पुणे : पुण्यात सिंहगडावर युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून तरुण आणि तरुणीने जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाज्याजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन युगलाने आत्महत्या केली. सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. याबाबत वनखात्याने हवेली पोलिसांना माहिती दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : Couple allegedly committed suicide at Sinhgad Fort latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV