पुण्यात एटीएमला आग, लाखोंची रोकड जळून खाक

मध्यरात्री या इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आणि पाहता पाहता या आगीने एटीएम सेंटरलाही आपल्या कवेत घेतलं.

पुण्यात एटीएमला आग, लाखोंची रोकड जळून खाक

पुणे : इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे.

पुण्यातल्या वारजे गणेश माथ्याजवळच्या परिसरात हे एटीएम आहे. मध्यरात्री या इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आणि पाहता पाहता या आगीने एटीएम सेंटरलाही आपल्या कवेत घेतलं.

ही आग रात्रभर धुमसत होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी, एटीएममध्ये असलेली सर्व रोकड जळून खाक झाली आहे. ही रक्कम नेमकी किती होती, याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान, गुरुवारीच या एटीएममध्ये पैसे भरले होते, त्यामुळे आगीत लाखोंची रक्कम खाक झाली असावी, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : Currency notes worth lakhs burnt in ATM fire
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV