पुण्यात दोन पुरुष आणि चिमुरड्याचा मृतदेह नाल्यात सापडले

पुण्याच्या सोमवार पेठ सारख्या मध्यवस्तीत असलेल्या नागरी नाल्यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले.

पुण्यात दोन पुरुष आणि चिमुरड्याचा मृतदेह नाल्यात सापडले

पुणे : पुण्यात एका नाल्यामध्ये तिघांचे मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तिन्ही मृतदेह पुरुषांचे असून त्यात एका चिमुरड्याचा समावेश आहे.

पुण्याच्या सोमवार पेठ सारख्या मध्यवस्तीत असलेल्या नागरी नाल्यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले. मृतदेहांची अवस्था वाईट असल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण जात आहे. त्यामुळे हत्येचं कारणही अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच तिघांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune triple murder

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : Dead body of two men and child found in Nala latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV