दीनानाथ रुग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलावलं, महिलेचा मृत्यू

डॉ. सतीश चव्हाण यांनी एका मांत्रिकाला बोलावून महिलेवर मंत्रतंत्राचा वापर केला, अखेर तिचा मृत्यू झाला

दीनानाथ रुग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलावलं, महिलेचा मृत्यू

पुणे : महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्दैवाने या घटनेत विवाहितेला प्राण गमवावे लागले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

पुण्यातील स्वारगेट परिसरातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे संध्या सोनवणे ही 24 वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. तिच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा अहवाल आला. मात्र ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली.

संध्याला तिला तातडीने पुण्यातील डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉ. सतीश चव्हाण यांनी एका मांत्रिकाला बोलावून मंत्रतंत्राचा वापर केला. याबाबत जाब विचारला असता, देव आणि मांत्रिकावर आपली श्रद्धा असल्यामुळे हे मंत्रोपचार करत असल्याचं डॉ. चव्हाण म्हणाले.

इतकंच नाही, सात ते आठ ही धोक्याची वेळ असल्यामुळे दहा ते अकरा या वेळेत शस्त्रक्रिया करण्याचंही डॉ. चव्हाणांनी सुचवल्याचं संध्याच्या भावाने सांगितलं.

अखेर संध्या सोनवणेचा रुग्णालयातच मृत्यू झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या प्रकाराची कसून चौकशीची मागणी करत डॉक्टर आणि मांत्रिकावर कारवाईची मागणी केली आहे.

पाहा व्हिडिओ :

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : Dr. Satish Chavhan from Dinanath Mangeshkar hospital called Mantrik, lady died latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV