पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं निधन

पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.

पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं निधन

पुणे: पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रविवारी खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र त्यांना झोपेतच हृदयविकाराचा धक्का आल्याचं सांगण्यात येत आहे.

चंचला कोदे या 2013 मध्ये राष्ट्रवादीकडून महापौरपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या सोनम झेंडे यांचा 41 मतांनी पराभव केला होता.

यंदा त्या प्रभाग क्रमांक 22 मधून दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या.

पहिल्यांदा जेव्हा निवडून आल्या, तेव्हाच त्यांना राष्ट्रावादीने थेट महापौरपदी बसवलं होतं. हसतमुख आणि मितभाषी नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती.

https://twitter.com/PawarSpeaks/status/942700780787773440

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune former mayor chanchala kodre passed away due to heart attack
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV