पुण्यातील उच्चभ्रू घरातल्या 4 विद्यार्थ्यांची बाईकचोरी

महागडे डिजिटल कॅमेरे, हायटेक सायकल आणि टू व्हीलर्स... पुण्याच्या फरासखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं हा लाखांचो ऐवज जप्त केला आहे.

Pune : four school students in upper class families theft bike for fun latest update

पुणे : पुण्यात उच्चभ्रू घरातल्या मुलांनी मौजमजा करण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग पत्करला होता. फरासखाना
पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज जप्त केला आहे.

महागडे डिजिटल कॅमेरे, हायटेक सायकल आणि टू व्हीलर्स… पुण्याच्या फरासखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं हा लाखांचो ऐवज जप्त केला आहे. मात्र ज्या टोळीकडून हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांचा चेहरा तुम्हाला दाखवू शकत नाही.

ही चोरी नववी आणि दहावीतल्या 4 विद्यार्थ्यांनी केली आहे. सराईत चोरांच्या टोळीलाही लाजवेल असा प्रताप
पुण्यातल्या उच्चभ्रू घरातल्या चार अल्पवयीन मुलांनी केला आहे.

कसबा पेठेतल्या एका शाळेसमोर एकाच क्रमांकाच्या दुचाकी उभ्या होत्या. ती वाहनं घेण्यासाठी कोण येतंय यावर पोलिस नजर ठेवून होते. मात्र ती वाहनं घेण्यासाठी जेव्हा शाळकरी मुलं आली तेव्हा पोलिसही चक्रावून गेले.

पोलिसांनी दुचाकीची डिक्की तपासली असता त्यांना महागडे कॅमेरे सापडले. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच हा सगळा ऐवज आपणच चोरला असल्याचं त्या मुलांनी कबूल केलं.

चोरी करणाऱ्या मुलांचे पालक चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत. मात्र मुलांना मौजमजा करण्याची चटक लागली होती. त्यासाठी पालकांकडून मिळणारा पॉकेटमनी कमी पडत होता.

चोरी करण्यात आलेला मुद्देमाल ऑनलाईन विकण्याचा मुलांचा डाव होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी पर्दाफाश केल्यामुळे मुलांचं पितळ उघडं पडलं. पालकांनी मुलांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलं आहे.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pune : four school students in upper class families theft bike for fun latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय तरुणाची हत्या
पुण्यात पूर्ववैमनस्यातून 32 वर्षीय...

पुणे : पुण्यात 32 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली

रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?
रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं...

पुणे : पुण्यात पहिल्यांदा गणपती कुणी बसवला, या वादाचा दुसरा भाग आता

ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात चितळेंच्या दुकानातून मिठाई गुल
ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात...

पुणे : पुण्याची ओळख असलेल्या चितळे स्वीट्स अँड स्नॅक्स या फर्ममधली

‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार कोटींपासून बोली
‘अॅम्बी व्हॅली’चा लिलाव सुरु, 37 हजार...

पुणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहारा उद्योगसमूहाचा

पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य
पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून...

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र

गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले
गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ...

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी

निळू फुले नाट्यगृह उद्घाटनावरुन भाजप-राष्ट्रवादीत वाद!
निळू फुले नाट्यगृह उद्घाटनावरुन...

पुणे: पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत टिळकांचा फोटो नाही
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य...

पुणे : पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा यंदा शतकोत्तर रौप्य

इराणी विद्यार्थिनीचा विनयभंग, पुण्यात प्राध्यापकाला अटक
इराणी विद्यार्थिनीचा विनयभंग,...

पुणे: पुण्यातील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात एका परदेशी

‘ब्लू व्हेल’च्या नादात मुलगा सोलापूरहून थेट पुण्यात!
‘ब्लू व्हेल’च्या नादात मुलगा...

पुणे : ब्लू व्हेल गेमचं भयानक रुप दिवसेंदिवस वाढत जात असून, आता