फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!

By: | Last Updated: > Wednesday, 24 May 2017 9:18 AM
फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!

मुंबई: निरोगी आयुष्यासाठी फिटनेस नेहमीच महत्वाचा असतो. पण बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात. असं असलं तरी पुणेकर मात्र फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहेत. नुकताच  फिटनेस ब्रॅण्ड रिबॉकनं केलेल्या फिट इंडिया सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे.

 

60 टक्के भारतीय आठवड्यातून किमान 4 तास आपल्या फिटनेससाठी देतात. यामध्ये पुणेकर सर्वाधिक वेळ देत असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

 

फिटनेसच्या बाबतीत पुणे आणि चंदीगड सर्वात पुढे:

 
सर्व शहरांमध्ये पुणेच्या फिट स्कोअर सर्वाधिक आहे. पुण्याचा फिटनेस स्कोअर 7.65% एवढा आहे. त्यामुळे देशभरात पुणेकर फिटनेससाठी सर्वात जास्त वेळ देतात. एवढंच नाही तर, एकापेक्षा जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी करतात. पुण्यानंतर चंदीगडचा फिटनेसमध्ये क्रमांक लागतो. चंदीगडचा फिटनेस स्कोअर 7.35% आहे.

 

चंदीगडमधील तरुणांचा निरोगी लाईफस्टाईलकडे फार ओढा आहे. येथील लोकं फिटनेससाठी फक्त रनिंगच करत नाही तर योग देखील न चुकता करतात.

 

पुणे आणि चंदीगड फिटनेसमध्ये पुढे असले तरी दक्षिणेकडील हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई यासारखी शहरं याबाबतीत बरीच मागे आहेत. त्यांचा फिटनेस स्कोअरही फारच कमी आहे.

 

या फिटनेस टेस्टमध्ये 20 ते 35 वर्षाचे 1500 महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेत सहभागी होणाऱ्या 80% लोकं निरोगी लाईफस्टाईलसाठी आग्रही होते.

 

सूचना: हा रिसर्च रिबॉकनं केला असला तरी एबीपी माझानं याची पडताळणी केलेली नाही. त्यामुळे कोणताही व्यायाम प्रकार सुरु करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

 

 

First Published:

Related Stories

रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!
रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!

मुंबई: आपली जीवनशैली सध्या फारच धकाधकीची झाली आहे. अशावेळी आपल्याला

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?
मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मुंबई : रजोनिवृत्ती म्हणजे शेवटची पाळी. शेवटची पाळी येण्याआधी तीन

आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!
आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!

नवी दिल्ली : मोबाईल अॅपवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘उबर’ने

सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा
सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा

मुंबई : अनेकदा मुलांनी शांत बसावं म्हणून काहीजण त्यांच्या हातात

विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!
विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये दोन किलोमीटरचा पिझ्झा बनवण्यात

ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन
ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन

टोरंटो : कॅनडातील ओंतारिओमधील लाल कांदा कर्करोगावर गुणकारी

ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!
ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!

नवी दिल्ली : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. हेच

सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!
सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!

नवी दिल्ली : तुम्ही वीकेंडला अधिक झोप घेता? तर सावधान… कारण

पुरुषांपेक्षा महिलांची झोप जास्त असते?
पुरुषांपेक्षा महिलांची झोप जास्त असते?

नवी दिल्ली : कोण जास्त झोपतो, यावरुन अनेकदा पती-पत्नीमध्ये किंवा