60 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, निगडीत 7 वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका

स्थानिक व्यायसायिक असलेल्या ओमच्या वडिलांना अपहरणकर्त्यांकडून तीन फोन कॉल आले होते. तिसऱ्या कॉलमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलाच्या बदल्यात 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

By: | Last Updated: > Tuesday, 26 September 2017 7:00 PM
Pune : Kidnapped Nigdi boy rescued within three days; no arrest yet

पुणे : निगडीत तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सात वर्षांच्या मुलाची सोमवारी सुखरुप सुटका झालं. ओम संदीप खरात असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव असून पोलिसांनी त्याला कुटुंबीयांकडे सोपवलं.

ओम खरातच्या घराशेजारी असलेल्या गोदामात तो सापडला. महत्त्वाचं म्हणजे त्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निगडीच्या पूर्णानगरमध्ये कारमधून आलेल्या अज्ञातांनी शनिवारी दुपारी ओमचं अपहरण केलं होतं. स्थानिक व्यायसायिक असलेल्या ओमच्या वडिलांना अपहरणकर्त्यांकडून तीन फोन कॉल आले होते. तिसऱ्या कॉलमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलाच्या बदल्यात 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती, असं निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी सांगितलं.

ओमच्या सुटकेसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे 400 पोलिस या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. पोलिस मोबाईल लोकेशनवरुन शोध घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ओमची सुटका करुन, तिथून पळ काढला. 50 तासांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी ओमची सुटका केली. अपहरणकर्त्यांनी मला गाडीच्या डिक्कीत ठेवलं होतं, असं ओमने पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं.

मुलाने तीन दिवसांपासून काहीच खालेलं नाही. पण आम्हाला सांगताना आनंद होतोय की, अपहरणकर्त्यांना एकही पैसा दिला नाही. आम्ही अजून त्यांना अटक केलेली नाही. यासंदर्भातील पुढील माहिती लवकरच देऊ, असं पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या.

दरम्यान, ओम खरातची सुटका झाल्याच्या आनंदात निगडीच्या एका बेकरी मालकाने खास त्याच्यासाठी केक आणला होता. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी स्वत: हातने ओमला केक भरवला.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pune : Kidnapped Nigdi boy rescued within three days; no arrest yet
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट
खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट

  पुणे : राज्यभर सुरू असलेल्या बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत

डीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला
डीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर

अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री
अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री

पुणे : एफटीआयआयचे नुतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये

डोक्यात कोयत्याने 17 वार करुन डेअरी व्यावसायिकाची निर्घृण हत्या
डोक्यात कोयत्याने 17 वार करुन डेअरी व्यावसायिकाची निर्घृण हत्या

पुणे : पुण्यात दूध डेअरी व्यायसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली

शरद पवारांकडून खास शैलीत अजित पवारांचं कौतुक!
शरद पवारांकडून खास शैलीत अजित पवारांचं कौतुक!

पिंपरी-चिंचवड : ‘अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या

पुणे : भाजप-आरपीआयच्या हिमाली कांबळेंचा 4583 मतांनी विजय
पुणे : भाजप-आरपीआयच्या हिमाली कांबळेंचा 4583 मतांनी विजय

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत

हायकोर्टाने ठाणे आणि पुण्यातील नवीन बांधकामांवरील बंदी उठवली
हायकोर्टाने ठाणे आणि पुण्यातील नवीन बांधकामांवरील बंदी उठवली

मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ठाण्यातील घोडबंदर आणि पुण्याच्या

तावडेंना कलाकारांबद्दल आदर नाही, मोहन जोशींचा हल्लाबोल
तावडेंना कलाकारांबद्दल आदर नाही, मोहन जोशींचा हल्लाबोल

पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन

पुण्यात विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला
पुण्यात विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला

पुणे : पुण्यात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकांवर ऊस

पुण्यात ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप
पुण्यात ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप

पुणे : पुण्यात एका महिलेने ओला कारमध्येच मुलाला जन्म दिला.