85 दिवसांच्या कोमानंतर पुण्यात गर्भवतीची प्रसुती

गेल्या 8 वर्षांपासून डायबेटिसनं त्रस्त असलेली प्रगती 5 मार्च रोजी शुगर लेव्हल कमी झाल्यानं बेशुद्ध झाली. त्यावेळी ती हायपोग्लायसेमिक कोमामध्ये गेली होती.

85 दिवसांच्या कोमानंतर पुण्यात गर्भवतीची प्रसुती

पुणे : पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात एक चमत्कार घडला आहे. 85 दिवस कोमात असलेल्या गर्भवतीनं एका सुदृढ बाळाला जन्म दिला. वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत आव्हानात्मक असा हा प्रकार मानला जात आहे.

85 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर 32 वर्षीय प्रगती साधवानी या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. हे शक्य झालं पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलच्या डॉ आर एस वाडिया आणि डॉ. सुनिता तांदूळवाडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे.

गेल्या 8 वर्षांपासून डायबेटिसनं त्रस्त असलेली प्रगती 5 मार्च रोजी शुगर लेव्हल कमी झाल्यानं बेशुद्ध झाली. 17 आठवड्यांची गर्भवती असलेल्या प्रगतीला 15 दिवसांच्या उपचारानंतर पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी ती हायपोग्लायसेमिक कोमामध्ये गेली होती.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 85 दिवसांनी प्रगतीनं पहिला शब्द उच्चारला. हळूहळू ती कोमातून बाहेर येऊ लागली. जिच्या जगण्याचीही शाश्वती नव्हती, तिनं एका नवीन जीवाला जन्म दिला.

वैद्यकीय विश्वात चमत्कार घडणं तसं कठीणच. मात्र उत्कृष्ट नियोजन आणि अथक प्रयत्नांनी रुबी हॉलच्या डॉक्टरांनी हा चमत्कार घडवून आणला.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV