शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी

31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार सुरु झाला

शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी

पुणे : पुण्यातील शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाचा घेतला आहे. यापुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असंही या निर्णयात म्हटलं आहे.

प्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजूने आहे.

सध्या अडीच हजार रुपयांमधे शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. मात्र वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच म्हणणं आहे.

31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार सुरु झाला आणि आज महापालिकेने वृत्तपत्रांमधून तशी जाहिरात दिली आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : No permission for private program at Shanivar wada
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV