पुण्यातीलही रस्त्यांचे खड्डे 'गोल गोल'

मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे राज्यासह देशभरात गाजत असताना, पुण्यातही वेगळं चित्र नसल्याचं दिसून येतंय.

पुण्यातीलही रस्त्यांचे खड्डे 'गोल गोल'

पुणे: मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे राज्यासह देशभरात गाजत असताना, पुण्यातही वेगळं चित्र नसल्याचं दिसून येतंय. कारण पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिल ते जूनदरम्यान पुण्याच्या रस्त्यांवर तब्बल 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र जुलै उलटण्यापूर्वीच रस्त्यांची चाळण झाल्याचं दिसून येतंय.

pune khadde4

पुणे महापालिकेने रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी 12 फिरत्या गाड्या तयार केल्याचं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं आहे, मात्र तरीही पुण्याच्या रस्त्यांवर खड्डे दिसत आहेत.

दरवर्षी रस्त्यांसाठी पुणे महापालिका शेकडो कोटी रुपये खर्च करते. शिवाय दुरुस्तीवर होणारा खर्च वेगळाच. मग हा सर्व पैसा जातो कुठे, हा प्रश्न पुणेकरांना सतावत आहे.

pune khadde 1

यावेळी रस्त्यांच्या खोदाईसाठी खाजगी कंपन्यांना अधिक वेळ देण्यात आला, त्यामुळे रस्त्यावरती जास्त खड्डे पडले आहेत, असं अजब उत्तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिलं.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: potholes pune खड्डे पुणे
First Published:
LiveTV