पत्नी, दोन मुलींची हत्या करुन पुण्यात व्यावसायिकाची आत्महत्या

आर्थिक कारणावरुन आत्महत्या करत असल्याचा उल्लेख निलेशने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

पत्नी, दोन मुलींची हत्या करुन पुण्यात व्यावसायिकाची आत्महत्या

पुणे : प्लास्टिक मोल्डिंग व्यावसायिकाने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. शिवणे उत्तमनगर भागात राहणाऱ्या 39 वर्षीय निलेश चौधरी यांनी कर्जबाजारीपणातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

पोलिसांना शनिवारी सकाळी 10 वाजता या घटनेची माहिती मिळाली. 7 वर्षीय श्रिया, 10 वर्षीय श्रावणी आणि 31 वर्षीय पत्नी नीलम यांचे मृतदेह बेडरुममध्ये, तर निलेश यांचा मृतदेह हॉलमध्ये पंख्याला दोरीने लटकलेल्या अवस्थेत सापडला. पत्नी आणि मोठी मुलगी श्रावणी यांच्या तोंडातून फेस येत होता.

आर्थिक कारणावरुन आत्महत्या करत असल्याचा उल्लेख निलेशने सुसाईड नोटमध्ये केला आहे. चौघांचे मृतदेह ससूनमध्ये पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर शेजारचे सगळे दाराला कुलूप लावून निघून गेले आहेत.

चौधरी यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता. मूळ कोपरे गावचं चौधरी कुटुंब गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात राहत होतं.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : Plastic Molding Businessman kills wife and daughters, commits suicide latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV