पुण्यात PMPML बसचालकाचं फोनवर बोलत ड्रायव्हिंग

शीतल मुंढे या सजग तरुणीनं पुणे महापालिका ते बालेवाडी मार्गावर प्रवास करताना ड्रायव्हर फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला.

पुण्यात PMPML बसचालकाचं फोनवर बोलत ड्रायव्हिंग

पुणे :  वाहन चालवताना फोनवर बोलल्याचे घातक दुष्परिणाम वारंवार समोर येऊनही काही जण त्यातून शिकवण घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या पीएमपीएमएलचा बसचालकच फोनवर बोलत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शीतल मुंढे या सजग तरुणीनं पुणे महापालिका ते बालेवाडी मार्गावर प्रवास करताना ड्रायव्हर फोनवर बोलत असतानाचा  व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

पीएमपीएमएलच्या अपघातात पुणेकरांचे जीव जात असताना बसचालकांनी पुणेकरांच्या जीवाशी खेळणं थांबवावं आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी संबंधित बसचालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शीतल मुंढे या तरुणीनं केली आहे.

आता पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यावर काय कारवाई करतात, याकडे प्रवाशांचं लक्ष लागलं आहे.

पाहा व्हिडिओ :

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune : PMPML Bus Driver talking on phone while driving latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV