पुणे: बनावट नोटा बनवणारा IT इंजिनिअर आणि टेलर अटकेत

उच्च दर्जाच्या प्रिंटरच्या साहाय्यानं तो 100 आणि 50 च्या बनावट नोटा तयार करत असे.

पुणे: बनावट नोटा बनवणारा IT इंजिनिअर आणि टेलर अटकेत

पुणे: बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी आयटी इंजिनिअर आहे. उदय प्रताप वर्धन असं या इंजिनिअरचं नाव आहे.

उच्च दर्जाच्या प्रिंटरच्या साहाय्यानं तो 100 आणि 50 च्या बनावट नोटा तयार करत असे. विशेष म्हणजे आयटीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी असूनही वर्धन बनावट नोटा बनवायचा. या नोटा चलनात आणण्यासाठी त्यानं संदीप नाफडेची मदत घेतली. नाफडे हा टेलर आहे.

सुरुवातीला थोड्या नोटा चलनात आणल्यानंतर त्यांचं धाडस वाढलं. पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने या दोघांना येरवडा परिसरातून अटक केली. हे दोघेही लोहगाव येथे राहतात.

दोन्ही आरोपींकडून शंभर रुपयाच्या 545 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसंच लॅपटॉप आणि प्रिंटरही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pune police arrested IT engineer with fake notes
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV