एव्हरेस्ट सर केल्याचा बनाव, राठोड दाम्पत्य पोलिसातून बडतर्फ

तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या पोलिस कॉन्स्टेबल दाम्पत्याने 23 मे 2016 रोजी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा केला होता. 5 जून 2016 रोजी पत्रकार परिषद घेऊन एव्हरेस्ट सर करणारे पहिले पती-पत्नी असल्याचा दावाही राठोड दाम्पत्याने केला होता.

एव्हरेस्ट सर केल्याचा बनाव, राठोड दाम्पत्य पोलिसातून बडतर्फ

पुणे : एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोटा दावा करणाऱ्या पुणे पोलिस खात्यातील दाम्पत्याला बडतर्फ करण्यात आलं आहे. राठोड दाम्पत्याने केलेल्या खोट्या दाव्यामुळे पोलिस दलाची बदनामी झाल्याचं कारण देण्यात आलं आहे.

तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या पोलिस कॉन्स्टेबल दाम्पत्याने 23 मे 2016 रोजी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा केला होता. 5 जून 2016 रोजी पत्रकार परिषद घेऊन एव्हरेस्ट सर करणारे पहिले पती-पत्नी असल्याचा दावाही राठोड दाम्पत्याने केला होता.

त्यांच्या या दाव्याबद्दल गिर्यारोहकांनी शंका उपस्थित केल्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली छळ केल्याने आपला गर्भपात झाला, असा आरोप तारकेश्वरी राठोड यांनी केला होता.

प्रथमदर्शनी राठोड दाम्पत्य खोटं बोलत असल्याचं आढळल्याने 16 नोव्हेंबर 2016 रोजी दोघांना पोलिस दलातुन निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांसमोर राठोड दाम्पत्य त्यांची बाजू मांडण्यासाठी हजरच राहिले नाहीत.

तारकेश्वरी आणि दिनेश राठोड यांनी एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करताना जे फोटो सादर केले होते, ते बनावट असल्याचं चौकशीत समोर आलं होतं. त्यामुळे नेपाळ सरकारनेही त्यांच्यावर दहा वर्षांची बंदी घातली. चौकशी समितीचा अहवाल मिळाल्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राठोड दांपत्याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.

कोण आहेत राठोड दाम्पत्य?

राठोड दाम्पत्य हे पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होतं. तारकेश्वरी आणि दिनेश हे दोघंही 2006  मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. 2008 मध्ये ते विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याचं ते सांगतात. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती.

संबंधित बातम्या :


चौकशीच्या नावाखाली छळ केल्याने गर्भपात, राठोड दाम्पत्याचा आरोप


एव्हरेस्ट सर केल्याचा बनाव, राठोड दाम्पत्य पोलिस दलातून निलंबित


पुण्याच्या कॉन्स्टेबल दाम्पत्याचा एव्हरेस्ट सर केल्याचा दावा खोटाः नेपाळ


पुण्याच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV