पुण्यात अडीच वर्षीय चिमुरडीची हत्या, लैंगिक अत्याचाराचा संशय

तिच्या आई वडिलांनी सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र रविवारी सकाळीच तिचा मृतदेह आढळून आला.

पुण्यात अडीच वर्षीय चिमुरडीची हत्या, लैंगिक अत्याचाराचा संशय

पुणे : पुण्यातील अडीच वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लहानगीचं अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली.

पुण्यातील धायरीमध्ये राहत्या घराजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडला. शनिवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास तिचं अपहरण करण्यात आलं होतं.

या प्रकरणी तिच्या आई वडिलांनी सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र रविवारी सकाळीच तिचा मृतदेह आढळून आला.

धायरीतील प्रायोजा सिटीमागे स्थानिकांना एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी सिंहगड पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असून सिंहगड रोड पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV