चोरट्यांचा धुमाकूळ, पुण्यात विसर्जन मिरवणुकीत अनेक मोबाईल लंपास

विसर्जन काळात दोन दिवसात मिरवणुकीत मोबाईल, मौल्यवान वस्तू पॅनकार्ड,आधारकार्ड हरवल्याच्या 1720 ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

चोरट्यांचा धुमाकूळ, पुण्यात विसर्जन मिरवणुकीत अनेक मोबाईल लंपास

पुणे:  पुण्यात विसर्जन मिरवणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणात लुटालूट झाल्याचं समोर आलं आहे. विसर्जन मिरवणुकांच्या दोन दिवसांच्या कालावधीत चोरीच्या एकूण 1 हजार 720 तक्रारी पुण्यात नोंदवण्यात आल्या आहेत.
पुण्यात सोन्याची चेन चोरताना भामटा सेल्फी व्हिडिओत कैद 

पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत दहा हजार पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हीची नजरही होती. मात्र असं असूनही विसर्जन काळात दोन दिवसात मिरवणुकीत मोबाईल, मौल्यवान वस्तू पॅनकार्ड,आधारकार्ड हरवल्याच्या 1720 ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

यामध्ये सर्वाधिक तक्रारी या मोबाईल चोरीच्या आहेत.

गणेश उत्सवकाळात अशा घटना घडण्याचं प्रमाण अधिक असतं.  यावेळी चोरीच्या काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. मात्र चोर तोपर्यंत आपलं काम करून पशार झाले होते.

संबंधित बातमी
पुण्यात सोन्याची चेन चोरताना भामटा सेल्फी व्हिडिओत कैद

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV