ओम पैठणे... पुण्याचा ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य अधिकारी

एके दिवशी एका प्रवाशाने ओला बुक केली. तो प्रवासी होता आर्मी कर्नल. प्रवासादरम्यान दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला सैन्य दलाचा.

ओम पैठणे... पुण्याचा ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य अधिकारी

मुंबई : स्वप्नांना इच्छाशक्ती आणि मेहनतीची जोड लागली, तर माणूस कुठलीही गोष्ट साध्य करु शकतो, याचं उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं आहे. पुण्याचा ओला कॅब चालक ओम पैठणे आता चक्क भारतीय सैन्यदलात दाखल होत आहे.

मेजर गौरव आर्य यांनी ट्विटरवरुन कॅडेट ओम पैठणेची प्रेरणादायी कहाणी शेअर केली आहे. ओम पैठणे हा पुण्याचा रहिवासी. ओला कॅबमध्ये तो ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे अहोरात्र मेहनत करुन कुटुंबाचं पोट ओम भरत होता.

ओला टॅक्सी चालवण्याची नोकरीच त्याच्या स्वप्नपूर्तीचा दुवा ठरली. एके दिवशी एका प्रवाशाने ओला बुक केली. तो प्रवासी होता आर्मी कर्नल. प्रवासादरम्यान दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला सैन्य दलाचा. कर्नलनी ओमला लष्कराविषयी भरभरुन सांगितलं. हे ऐकून ओम भारावून गेला.

ओमने कर्नलसाहेबांकडून प्रेरणा घेतली आणि लष्करात भर्ती होण्याच्या स्वप्नाने तो झपाटून गेला. मेहनत करुन त्याने ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी जॉईन केली. सशस्त्र सीमा दलाची परीक्षा ओमने दिली आणि तो पास झाला. कॅडेट ओम पैठणे दहा मार्च रोजी ऑफिसर म्हणून पासआऊट होणार आहे.

महत्त्वांकाक्षा असेल आणि चिकाटीने मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतंही स्वप्न साध्य करता येतं, हे ओम पैठणेच्या उदाहरणातून नक्कीच शिकता येईल.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune’s Ola cab driver Om Paithane becomes an officer in Indian Army latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV