राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं.

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.

या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं.

डीएसके आर्थिक अडचणीत सापडले आहेत, मात्र ते फसवणूक करणाऱ्यांपैकी नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. मराठी व्यवसायिकांना संपवण्यासाठी एक लॉबी कार्यरत असून काही राजकारणीही त्यामध्ये सामील असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

दरम्यान, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या डीएसकेंच्या गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांमधे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींवर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे.

पुणे सत्र न्यायालयाने डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर,  मुंबई उच्च न्यायालयाने तीनवेळा डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ दिली.

डीएसकेंना कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या 30 तारखेला डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर डीएसकेंच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिले आहेत. डीएसकेंच्या साडे आठ हजार हजार गुंतवणूकदारांपैकी सातशे ते आठशे गुंतवणूकदार राज ठाकरेंसोबतच्या या बैठकीला उपस्थित होते.

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

दरम्यान गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर डीएसकेंनी मंगळवारी पहिल्यांदाच  पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं.

“मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही. आम्ही कोणालाही फसवलं नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ”, असं आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Raj Thackeray Supports D S Kulkarni
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV