पुणे महापालिकेत तब्बल 2 हजार जागांसाठी भरती!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 21 April 2017 5:30 PM
पुणे महापालिकेत तब्बल 2 हजार जागांसाठी भरती!

पुणे: पुणे महापालिकेत तब्बल 2 हजार पदांसाठीची मेगाभरती लवकरच होणार आहे. जूनअखेरपर्यंत भरती प्रकियेस सुरुवात होईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे महापालिकेची एकूण मान्य पदांची संख्या 19 हजार 359 इतकी होती. त्यात ऑगस्ट 2014 मध्ये नव्या सेवा प्रवेश नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यात नव्याने 3 हजार 877 पदांच्या निर्मितीसही शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे

पुणे महापालिकेत आतापर्यंत 17 हजार 86 पदे भरली गेली असून जवळपास 6 हजार 561 पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य, घनकचरा, अतिक्रमण, प्रशासन विभाग अशा विविध विभागांतील अनेक अत्यावश्यक पदांचा समावेश आहे.

अत्यावश्यक विभागातील जवळपास दोन हजार पदे भरण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. अतिक्रमण, सुरक्षा, वाहन चालक, आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, फायरमन अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या पदांच्या भरतीसाठी रोस्टर तयार केले असून ते रोस्टर शासनाच्या मागासवर्ग विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. येत्या महिनाभरात त्यास मंजुरी मिळेल. त्यानंतर भरतीची प्रकिया सुरू होईल. महापालिकेच्या विविध पदांसाठीची भरती प्रकिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

First Published: Friday, 21 April 2017 4:48 PM

Related Stories

अरुण गवळी पुन्हा तुरुंगाबाहेर येणार, फर्लो मंजूर
अरुण गवळी पुन्हा तुरुंगाबाहेर येणार, फर्लो मंजूर

नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ अरुण गवळी पुन्हा एकदा फर्लोवर

एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास, पहिलं काम....: आ. बच्चू कडू
एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास, पहिलं काम....: आ. बच्चू कडू

मुंबई :  शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासांठी आसूड यात्रेद्वारे

कृषी आणि पणनमंत्र्यांची हकालपट्टी करा : विखे-पाटील
कृषी आणि पणनमंत्र्यांची हकालपट्टी करा : विखे-पाटील

सांगली:  तूर खरेदीच्या मुद्यावरून सरकारने पणन मंत्री सुभाष देशमुख

न पिणाऱ्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड का? : अजित पवार
न पिणाऱ्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड का? : अजित पवार

सांगली: पिणाऱ्याकडून घ्यायचा टॅक्स न पिणाऱ्यांकडून घेताना लाज

पुणे - शौचालयात महिलेचं छायाचित्र काढणारा अटकेत
पुणे - शौचालयात महिलेचं छायाचित्र काढणारा अटकेत

पुणे: पुण्यात कधी काय घडेल आणि काय नाही हे सांगता येत नाही. कधी

राज्यातील तूर खरेदी केंद्र बंदच, 24 तासानंतरही आदेश नाही
राज्यातील तूर खरेदी केंद्र बंदच, 24 तासानंतरही आदेश नाही

उस्मानाबाद : ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केली आहे,

भाजपचं सरकार म्हणजे बशा बैल : अजित पवार
भाजपचं सरकार म्हणजे बशा बैल : अजित पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांचा ग्रामीण

... अन्यथा गोंदियाचंही सुकमा झालं असतं!
... अन्यथा गोंदियाचंही सुकमा झालं असतं!

गोंदिया : नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी पुरून ठेवलेला स्फोटक

गोंदियात नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर कोसळलं
गोंदियात नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर कोसळलं

गोंदिया : गोंदियातील बिरसीमध्ये नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर

'समृद्धी हायवे'विरोधात शेतकऱ्याचं राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो
'समृद्धी हायवे'विरोधात शेतकऱ्याचं राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी