सांगलीत एसटी-आयशरचा अपघात, तर अमृतांजन पुलाच्या पिलरवर कंटेनर आदळला

सांगली बायपास रोडवर एसटी आणि आयशरचा आज भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अमृतांजन पुलाजवळ कंटेनर पुलाच्या पिलरवर आदळला.

सांगलीत एसटी-आयशरचा अपघात, तर अमृतांजन पुलाच्या पिलरवर कंटेनर आदळला

 

सांगली/ पिंपरी-चिंचवड : सांगली बायपास रोडवर एसटी आणि आयशरचा आज भीषण अपघात झाला. या अपघातात 18 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अमृतांजन पुलाजवळ कंटेनर पुलाच्या पिलरवर आदळला. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगलीहून इस्लामपूरकडे एक एसटी जात असताना, तिची धडकला आयशरला जोरदार धडक बसली. यात एसटी ड्रायव्हरकडील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात एसटीमधील ड्रायव्हरसह 18 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही वर्षाअखेरच्या शेवटच्या रविवारी अपघाताचं सत्र सुरुच होतं. अमृतांजन पुलाखालचा वळण घेताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट पुलाच्या पिलरवर आदळला. या अपघातात केबिनचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातानंतर काहीकाळ एक्स्प्रेस वेवरील वाहतूक मंदावली होती. पण पोलिसांनी कंटेनर बाजूला करुन, वाहतूक पूर्ववत केली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: road accident in sangli and mumbai-pune expressway
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV