भांडारकर संस्थेतील तोडफोड: संभाजी ब्रिगेडचे 72 कार्यकर्ते निर्दोष

13 वर्षांपूर्वी म्हणजे 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.

भांडारकर संस्थेतील तोडफोड: संभाजी ब्रिगेडचे 72 कार्यकर्ते निर्दोष

पुणे : 13 वर्षांपूर्वीच्या भांडारकर संस्थेतील तोडफोड प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने संभाजी ब्रिगेडच्या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे प्रकरण?
अमेरिकन लेखक जेम्स लेनने 'शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक लिखाण केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. यामध्ये भांडारकर संस्थेतील 12 जणांनी जेम्स लेनला मदत केल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला होता.

13 वर्षांपूर्वी म्हणजे 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संभाजी ब्रिगेडच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करुन त्यांना आरोपी करण्यात आलं होत.

यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ruckus at Bhandarkar Oriental Research Institute : 72 workers of Sambhaji Brigade acquitted by Pune sessions court
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV