पिंपरीत मोफत घरांची अफवा, गृहप्रदर्शनात तोडफोड

पिंपरी येथील महापालिकेच्या ऑटोक्लस्टरमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात होतं.

पिंपरीत मोफत घरांची अफवा, गृहप्रदर्शनात तोडफोड

पिंपरी चिंचवड : टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात तोडफोड करण्यात आली. मोफत घरांच्या अफवेने लोकांचा संताप झाला. पिंपरी येथील महापालिकेच्या ऑटोक्लस्टरमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.

घरांसाठी पंतप्रधान कोट्यातून मिळणाऱ्या शासकीय कर्जासंदर्भात माहिती दिली जाणार होती. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.

मात्र काहींनी मोफत घरं देऊ अशा जाहिराती केल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली, परंतु प्रदर्शनात केवळ कर्जाविषयी आणि बांधकाम व्यावसायिकांची माहिती मिळत असल्याने भ्रमनिरास झाला आणि आलेल्या 500 ते 600 नागरिकांनी तोडफोड केली.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rumors of free houses in the Pimpri
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV